राजस्थान : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. भ्रष्टाचार लोकशाही संविधान constitution अशा अनेक विषयांवर विरोधक पंतप्रधानांवर PM Narendra Modi टीकाटिप्पणी करत आहेत. यावरूनच आज राजस्थानच्या बारमरी येथील प्रचार सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आज राजस्थान मधील बारमर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने आणि इंडिया आघाडीने बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केला असा थेट आरोप केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, ” एससी, एसटी आणि ओबीसीन सोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारा काँग्रेस पक्ष आज-काल एक जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा पण निवडणूक येते त्यानंतर संविधानावरून खोटं बोलणं ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. ती काँग्रेस जिने बाबासाहेब हयात असताना त्यांना निवडणुकीत हरवलं. ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिलं नाही. त्या काँग्रेसने देशात आणीबाणी लागू करून संविधान संपवण्याचा प्रयत्न केला. आज तीच काँग्रेस मोदीला शिव्या देण्यासाठी संविधानाच्या आडून खोटं बोलत आहे. असं यावेळी पंतप्रधान म्हणाले आहेत.
त्याचबरोबर खुद्द बाबासाहेब आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. सरकारसाठी संविधान हे गीता, रामायण, महाभारत, बायबल आणि कुराण आहे. भारता विरोधात इंडिया आघाडी वाले किती द्वेषाने भरलेले आहेत ते पहा. मोदींचे शब्द तुम्ही लिहून ठेवा. ” असं यावेळी पंतप्रधान म्हणाले आहेत.