पुणे : यंदा पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Election तिहेरी लढत होणार आहे. पहिल्यापासूनच निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीच्या मैदानात उडी मारली आहे. दरम्यान पुण्यात Pune माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरे यांचा आशीर्वाद घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, ” रवींद्र धंगेकर यांनी काम केलं असेल तर लोक त्यांना मतदान करतील. विकास करणे अशक्य कुठेच नसतं. या शहराचा जेव्हा खासदार होईल तेव्हा संपूर्ण शहराचा विकास करेल. त्यासाठी सहाही विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे भाजपने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं, असं ते म्हणाले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याच जाहीर केले. यावर देखील भाष्य करताना ते म्हणाले की, ” राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही. भाजपचं 400 पारच स्वप्नच राहणार आहे. निवडणुकी संदर्भातला माझा फॉर्मुला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मनसे पक्ष सोडल्यानंतर माझ्या विचारांशी मी ठाम आहे. रात्री उशिरा मी राज ठाकरेंची सभा पाहिली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर पक्षांचा विचार सोडला. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हे चार जूनला समजेलच असं यावेळी वसंत मोरे म्हणाले आहेत.