माढा : माढ्यामधून लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Elections 2024 उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हा तिढा अद्याप महाविकास आघाडी कडून सुटलेला नाही. असं असतानाच नुकतीच एक मोठी बातमी समोर येते आहे. भाजपसोबत फारकत घेऊन धैर्यशील मोहिते पाटील Dhairyashil Mohite Patil राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात Ncp’s Sharad Pawar faction प्रवेश करणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना लोकसभेसाठी माढ्यातून अधिकृत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून माढा प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणताही निर्णय अद्याप जाहीर केला नव्हता. दरम्यान महायुतीने रणजीत सिंह निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि मोहिते पाटील प्रचंड नाराज झाले. यानंतर मोहिते पाटील हे आता पुढे कोणती भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राच लक्ष होतच. दरम्यान आता मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या 13 एप्रिलला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील हे पक्षप्रवेश करणार असल्याचं समजते आहे. महायुतीने रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली. तर अनेक वर्षांपासून राजकारणात माढ्यातून दबदबा असलेले मोहिते पाटील हे देखील इच्छुक होते. परंतु भाजपच्या या निर्णयानंतर माढ्यात भूकंप आला. त्यानंतर मोहिते पाटील हे बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तर आता 13 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.









