पुणे : पुण्यात आज रोहित पवारांनी Rohit Pawar पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद चांगलीच गाजली आहे. कारण आज पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी थेट जिवंत खेकडाच आणला. त्याचबरोबर त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे.
नेमकं प्रकरण काय
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर साडेसहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. रुग्णवाहिका सेवेमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचं त्यांनी म्हटल आहे. पत्रकार परिषदेमध्ये आज त्यांनी खेकडा दाखवून सुरुवात करताना म्हटले की, आज मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे. खेकडा वळवळ करतो, धरण पोखरतो आणि बिळात जाऊन बसतो लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो असं त्यांनी या घोटाळ्याबद्दल म्हटल आहे. या घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले की, ” हा दलालीचा प्रकार असून यातील मिळालेला पैसा निवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी थेट आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी देखील आज केली आहे.
रोहित पवार यांनी आज आरोग्यमंत्र्यांवर मोठ्या भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला. तसेच समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान देखील त्यांना दिला आहे. त्यांनी सांगितलं की, पिंपरी चिंचवड येथील सुमित फॅसिलिटी आणि बीव्हीजी ग्रुपचा या गैरप्रकारामध्ये सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
https://www.facebook.com/share/v/EyGKxNfYRBh9WnQq/?mibextid=ZbWKwL