महाराष्ट्र : महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय वातावरण पाहता सर्वच पक्षाचे अगदी अनुभवी नेते सुद्धा ताक फुंकून पीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू होता. आता हा तिढा बऱ्यापैकी सुटला असून कोणता उमेदवार कुठून लढणार याची उत्सुकता होतीच.
दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काही वेळा पूर्वीच महत्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या यादीमध्ये पाच उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
कोण आहेत हे उमेदवार
सुप्रिया सुळे – बारामती
अमर काळे – वर्धा
डॉक्टर अमोल कोल्हे – शिरूर
निलेश लंके – अहमदनगर
भास्कर राव भगरे – दिंडोरी
या पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कालच अहमदनगरचे निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन अहमदनगरमधून रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे अहमदनगरमधून सुजय विखेंना त्यांचं तगडं आव्हान असणार आहे. शिरूर मधून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडणूक लढवतील. तर दिंडोरीमध्ये भास्कर भगरे यांच्या विरोधात भारती पवार यांचे आव्हान असणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी केव्हा जाहीर होणार असे सवाल उपस्थित केले जात होते. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.