लोणावळा : लोणावळ्यातून Lonavala आज एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. लोणावळ्यातील एका प्रशस्त व्हीलामध्ये थेट अश्लील व्हिडिओचे चित्रीकरण केले जात आहे अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या व्हिलावर छापा टाकून 15 जणांसह या व्हीलाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा Crime दाखल केला आहे.
कायद्याने असे व्हिडिओ चित्रीकरण करण्यावर बंदी आहे. अशा व्हिडिओमुळेच समाज मनामध्ये विक्षिप्तपणा वाढतो आहे. लोणावळ्यासारख्या पर्यटन ठिकाणी एका प्रशस्त व्हीलामध्ये अशा व्हिडिओचं चित्रीकरण सुरू असणं ही एक धक्कादायक बाब आहे. या धंद्याविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या व्हीलावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी एक कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केले.
याप्रकरणी जे 15 जण ताब्यात घेण्यात आले आहेत ते भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, यामध्ये विष्णू साव कलकत्ता, जावेद खान उत्तर प्रदेश, अलका राजन साऊथ वेस्ट दिल्ली, नेहा वर्मा उत्तर प्रदेश, रिया गुप्ता दिल्ली, बुद्धसेन श्रीवास चंद्रपूर, समीर मेहता आलम उत्तर प्रदेश, अनुप चौबे मुंबई, रामकुमार यादव हरियाणा, विना पवळे ठाणे, मैनाज जाहीर हुसेन खान पालघर, राहुल नेवरेकर ठाणे, अनिकेत शर्मा गुजरात, वंशज वर्मा डेहराडून, मनीष चौधरी हरियाणा, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासह या व्हीलाचे मालक यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.