अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघ दक्षिणेचा महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. या जागेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके MLA Nilesh Lankay आग्रही आहेत. दरम्यान निलेश लंकेंबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Senior Congress leader Balasaheb Thorat यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांची जोरदार एन्ट्री होईल आणि तेथील निवडणूक देखणी होईल.”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत पुन्हा येण्याबद्दल देखील ते म्हणाले की, ” प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पक्षश्रेष्ठी चर्चा करीत आहेत. त्यांनी महाविकास आघाडीत यावे अशी आमची अपेक्षा आहे.”
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्या महायुती सोबत जाण्याच्या निर्णयाबाबत म्हटले आहे की, “लावारे तो व्हिडिओ ! मुळे राज्यात लोकप्रियता मिळवलेले राज ठाकरे महायुती सोबत गेले तर त्यांचा प्रभाव ओसरेल”
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. यावर ते म्हणाले की ” आमच्याकडे जागा वाटपाचा ‘तिढा’ असला तर महायुतीमध्ये ‘तिढे’ आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांना केलेली अटक हे भाजप घाबरला असल्याचे लक्षण असल्याची जोरदार ठिकाणी यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.