शिरूर : शिरूर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार या चर्चेवर आता पूर्णविराम लागला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केव्हा होणार असे प्रश्न राजकीय वर्तुळात आणि समाज मनात निर्माण झाले होते. यावर आता असे बाळबोध प्रश्न आता विचारू नका असं शिवाजीराव पाटील म्हणाले आहेत.
पक्षप्रवेशाबाबत बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, ” माझं एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील येत्या 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठा होणार असल्याचे समजते. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे हजारो समर्थक देखील त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
शिरूरच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा महायुतीचा तिढा लवकरच सुटेल. आज संध्याकाळपर्यंत शिरूरच्या जागेबाबत निश्चित माहिती दिली जाईल. असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर शिरूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार असे बाळबोध प्रश्न विचारू नका, राष्ट्रवादीचा उमेदवार शिरूर मधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल असं ते म्हणाले. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं तगडे आव्हान असणार आहे.