मुंबई : सध्या बारामतीमध्ये Baramati केवळ पवार विरुद्ध पवार असा वाद चर्चेत नाही तर यामध्ये विजय शिवतारे Vijay Shivtare यांचे देखील नाव आहे. अर्थात अजित पवारांच्या विरोधात विजय शिवतारे यांनी बंड पुकारले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar आणि विजय शिवतारे हे एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत.
यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देखील उडी घेतली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये विजय शिवतारे यांना टीका करताना सवाल केला होता की तुझा आवाका काय ? तू बोलतोय काय ? यावर शिवतारे यांनी देखील माझी लायकी काय आहे हे अजित पवारांना सांगतो असं प्रत्युत्तर दिलं होतं.
राजकीय वर्तुळात एकीकडे या दोघांच्या टीकाटिप्पणीवर खरमरीत चर्चा सुरू असतानाच युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी शिवतारेंवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, मागच्या वेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता. यावेळी सांगून त्यांचे डिपॉझिट जप्त करू… त्यांच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आम्हालाही पाहायचं आहे की शिवतारेंचा आवाका काय ? असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला आहे.