छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM एआयएमआयएम पक्षानं पुन्हा एकदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांना उमेदवारी घोषित केली आहे. हि जवळपास निश्चितच उमेदवारी मानली जात होती. पण आता पुन्हा एकदा यावर्षी देखील ही लढत तिरंगी असणार आहे.
छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाली आहे. तर महाआघाडीच्या वतीने ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिलेली आहे. अर्थात आता बाकी दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट नाहीये. त्यामुळे ही लढत तगडी होणार यात शंका नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशीच तिहेरी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणुकीत मैदानात उतरले होते. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेला चांगलाच फटका बसला होता. याचा फायदा एआयएमआयएम AIMIM पक्षाचे इम्तियाज जलील यांना झाला. आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या तिहेरी लढतीमध्ये निर्णय काय येतो आणि बाकी दोन उमेदवार कोण असणार हे लवकरच स्पष्ट होईल.