मुंबई : दोनच दिवसांपूर्वी विजय शिवतारे Vijay Shivtare यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांची बारामतीच्या उमेदवारी संदर्भात सुरू असलेल्या पेचाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. दरम्यान वर्षा बंगल्यावर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती. तर दोन दिवसात मी इतर नेत्यांशी चर्चा करून सांगतो असं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवताऱ्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची शिवतारे यांनी भेट घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वी जेव्हा शिवतारे मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्यावेळी त्यांनी काहीशी सबुरीची भूमिका घेतली होती. पण आज आता त्यांनी आपल्या जागेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवतारे यांनी मोठा गोप्या स्फोट देखील केला आहे. ते म्हणाले की, ” आमच्या मुख्यमंत्र्यांना कशाला ब्लॅकमेल करतो ? इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू, असा इशारा देतो… कशाला करतो ? लढ ना तुझ्या ताकदीवर … ! असा टोला शिवतारेंनी लगावला आहे.
त्याचबरोबर अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, ” अजित पवार यांनी माझा आवाका काढला होता. तुझी लायकी किती ? तू बोलतो किती ? तुझा आवाका किती ? असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावर शिवतारे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ” माझा नाही आवाका तर कशाला धडपड करतो ? माझा पाठिंबा जनतेला आहे, जनता सांगेल ते मी करणार, महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन ते चार दिवसात भूमिका व्यक्त करणार…! ” असं शिवतारे यांनी म्हटलं आहे.