हातकणंगले : लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. सर्वच इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याच्या इच्छेने नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. आता उमेदवार देखील निश्चित झाले आहेत आणि निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडी हातकणंगलेची जागा ही आता स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या राजू शेट्टी Raju Shetty यांना सोडणार असल्याचं समजत आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धैर्यशील माने हे राजू शेट्टी यांच्या विरोधात विजयी झाले होते. सध्या धैर्यशील माने हे महाविकास आघाडीमध्ये आहेत. दरम्यान राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर अखेर आज हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडण्याचं निश्चित झाला आहे.
स्वतः राजू शेट्टी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली त्यांनी 7 मी सर्वजण साथ द्या अशी पोस्ट केली आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे धैर्यशील माने यांना 5 लाख 85 हजार मतं मिळाली होती. तर राजू शेट्टी यांना चार लाख 89 हजार 737 मत मिळाली होती. या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने यांनी तब्बल 96 हजार 39 मतांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करून राजू शेट्टी यांनी आता हातकणंगलेची आपली जागा निश्चित केली.