दापोली : रत्नागिरीतील दापोलीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब Anil Parab यांचे मालकीचे साई रिसॉर्ट होते. हे रिसॉर्ट अनधिकृत असून चार आठवड्यात हे रिसॉर्ट पाडले जावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने Bombay High Court दिले आहेत. दरम्यान हे रिसॉर्ट सदानंद कदम यांना विक्री करण्यात आले आहे. या प्रकरणी रिसॉर्टचे दुसरे मालक सदानंद कदम यांनी हायकोर्टात धाव घेतली होती .
उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांना हा मोठा धक्का मानला जातोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2020 साली या रिसॉर्टच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुंबई हायकोर्टाने आता हा रिसॉर्ट अनधिकृत असून तो पाडण्यात यावा असे आदेश दिले आहेत. यापूर्वी खेड जिल्हा कोर्टाने रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे रिसॉर्ट सदानंद कदम यांना विक्री करण्यात आले.
त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या एका तज्ञांच्या समितीने या रिसॉर्टची पाहणी केली आणि हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं जाहीर केलं. यानंतर रिसॉर्टचे दुसरे मालक सदानंद कदम यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु आता मुंबई हायकोर्टाने देखील हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत .