कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हातकणंगलेमध्ये आहेत. हातकणंगलेमधील कोरोचीमध्ये गावामध्ये आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री हसनमुश्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायचं असल्याचं सांगितल आहे. मुख्यमंत्र्यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलंय त्यात भाजपचे प्रमुख नेते हे देखील दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यामुळे आता जागा वाटपावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
महाराष्ट्रातील अद्याप एकही लोकसभेची जागा निश्चित करण्यात आलेली नाही. जागा वाटपाबाबत महायुती मधील भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून पेच निर्माण झालेला आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रात होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील जागा वाटपावरून महत्त्वाची चर्चा केल्याचा देखील स्पष्ट झालं होतं. त्यानंतर अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार हे स्पष्ट झालं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने दिल्लीतून बोलावण आल आहे. त्यामुळे आता जागा वाटपाबाबत लवकरच अंतिम निर्णय येऊ शकतो अशी शक्यता आहे.
मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, जागा वाटपाबाबत आज रात्री दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पुढच्या काही दिवसातच महायुतीच्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतो.