मुंबई : आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण Maratha Reservation कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी चौकशीची कारवाई करण्यात येणार असल्याचे विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या अपशक्तांबाबत दिलगिरी व्यक्त केली. परंतु आपली मागणी अद्यापही तीच असल्याच देखील त्यांनी ठामपणे सांगितल आहे. अशातच आता राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे स्प्ष्ट करण्यात आले आहे.