अकोला : नुकताच अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा पोलिसांबाबत केलेला त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत नितेश राणे यांना थेट वेडा आमदार म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय
एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना नितेश राणे यांनी पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले होते, ” पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार, त्यांना जागेवर राहायचं आहे की नाही? ते माझ्या भाषणाच चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत. ” असं थेट वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.
PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल
प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा खरपूस समाचार घेत त्यांना थेट वेडा आमदार म्हटले आहे. अकोल्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” त्यांच्या वक्तव्यामुळे काही फरक पडणार नाही. पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कारवाई होऊ शकते. पण माझ्या मते पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करावं. एक वेडा आमदार बोलला असं समजावं. त्याच्या या वक्तव्यामुळे समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. ” अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.