महाराष्ट्र : आजपासून बारावीच्या HSC परीक्षेला सुरुवात झाली आहे. २१ फेब्रुवारी ते २४ मार्च दरम्यान परीक्षा पार पडणार आहे. दरम्यान एक महत्वाची बातमी समोर येते आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका घेत विविध मागण्यांकरिता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. वेतनवाढ, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंडळाने अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीच्या तुलनेत ऑनलाइन प्रणालीमुळे काम अधिक वेगाने होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेवरही होऊ शकतो. त्यामुळे मे अखेरीपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.