जालना : मराठा आरक्षण Maratha Reservation हा मुद्दा अद्याप देखील कळीचा बनवून राहिला आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अद्यापही उलथा पालपालथं सुरूच आहे. अशात सगे सोयरे याबाबत अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसले आहेत. आतापर्यंत तीन वेळा आमरण उपोषण करण्यात आले आहे. तर नुकतेच मुंबईमध्ये पदयात्रा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालावली आहे.
https://www.facebook.com/share/v/FkXbSN7xhM5oPE8U/?mibextid=qi2Omg
आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यांचे हात थरथरत आहेत. तर बोलणं देखील जड झाल आहे. त्याचबरोबर आज सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्राव देखील झाला आहे. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचा वातावरण पसरल आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=322254863618095&id=100093693356025&mibextid=6aamW6
जरांगे पाटील यांनी कमीत कमी पाणी तरी प्यावं यासाठी सर्वजण सातत्याने आग्रह धरत आहेत. परंतु जोपर्यंत सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही अशीच भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
https://www.facebook.com/emahatalks/videos/350070231240655
यावर आता राज्य सरकार काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून आज जालना, बीड ,सोलापूर आणि नाशिक मध्ये बंदची हाक पुकारण्यात आली आहे.