नागपूर : एक मोठी माहिती समोर येते आहे. नागपुरातील काटोल नगर परिषदेच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा सर्वपक्षीय कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झाला आहे. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणाला भाजपने विरोध केल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान अनिल देशमुख आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भाषणा दरम्यान राडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काटोलमध्ये विकास कामांचं भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा सर्वपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणादरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून राहुल देशमुख यांचं भाषण मध्येच थांबवलं. यावरूनच वादाला सुरुवात झाली. राहुल देशमुख यांचं भाषण मध्येच थांबवल्यानंतर अनिल देशमुख हे भाषणाला उभे राहिले. यावेळी मोठा वाद निर्माण झाला. तर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांमध्ये आक्रमक झाल्याचं समजत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…