मुंबई : दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. या भयंकर घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये हा हल्ला किती भयंकर होता हे दिसून येते. दरम्यान त्यानंतर देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत थेट विधान केल होत. यावरून आता राजकीय वर्तुळातील वातावरण प्रचंड चिघळल आहे.
विधिमंडळाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गोळीबार प्रकरणी गायकवाड यांना कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेना मंत्री आक्रमक झाले आहेत. आज या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने केली गेली आहे.
Ulhasnagar Firing Case : ” कायद्यासमोर सगळे समान;कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल..! ” गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
एकंदरीतच या संपूर्ण प्रकारातून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात गणपत गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे युतीमध्ये सर्व काही अलबेल राहील नाहीये हे स्पष्ट आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच कोण कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका घेतली होती. यानंतर आता देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
OBC महाएल्गार मेळावा : मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर ‘त्या’ ट्वीटची चर्चा; छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ?