मुंबई : आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतं प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत असून बॉलीवूड देखील मतदानासाठी हजेरी लावत आहे.
अनेक अभिनेता आणि अभिनेत्री मतदान केंद्रांवर हजेरी लावताना दिसत असून दीपिका आणि रणवीर Deepika-Ranveer देखील आज मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मतदानासाठी आलेल्या दीपिकाच्या बाबत मात्र वेगळीच चर्चा सुरू होती. दीपिका आणि रणवीर यांनी ते दोघेजण लवकरच आई-बाबा होणार असल्याचं चहात्यांना सांगितलं होतं. पण दीपिकाचं बेबी बम्प का दिसत नाही? म्हणून सरोगसीच्या माध्यमातून हे दोघेजण बाळाला जन्म देणार अशा चर्चेला उधाण आलं होतं.
https://www.instagram.com/reel/C7LozyPIwUn/?utm_source=ig_web_copy_link
आज मतदानासाठी खरंतर हे दोघेजण पोहोचले होते. पण पहिल्यांदाच दीपिकाच बेबी बम्प स्पष्ट दिसल्यामुळे तिच्या चाहत्यांनी सरोगसीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आज पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल शर्टमध्ये दीपिका दिसून आली. यावेळी मतदान करून हे दोघेजण बाहेर आले. तेव्हा एका व्हिडिओमध्ये दीपिकाने आपल्या पोटावर हात ठेवला असताना तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसून येतोय. रणवीर देखील तिला सावरताना दिसतोय. दोघेही जण जबाबदार नागरिक म्हणून खरंतर मतदानासाठी पोहोचले होते. पण त्यांच्या चाहत्यांनी मात्र वेगळ्याच चर्चेला हवा दिल्याचे पाहायला मिळत आहे.