सध्या सोशल मिडियावर अनेक वेगवेगळे तंत्रज्ञानासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात. पण त्यातली सत्यता कमीच लोक जगासमोर मांडण्यात यशस्वी होतात. मनुष्याची जागा जर मशीन घेणार असतील तर मानवाला घाबरण्याची गरज आहे? असे सांगणारे अनेक अहवाल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
मानवाला पृथ्वीवरील बुद्धीमान प्राणी म्हटंले जाते. याच बुद्धीनमानांच्या यादीत (Artificial Intelligence) क्षेत्रामधील इंटेलिजंट मशीनचा देखील समावेश होणार आहे. ही मशीन मनुष्याप्रमाणेच बुद्धीमान असते. या मशीनला मनुष्यासारखी विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता असते. याची उदाहरणे द्यायची झाल्यास गुगल मॅंप्स, गुगल लेन्स, AI Camera, Google Assistant, CHATGPT,अलेक्सा किंवा सिरी या सिस्टिम AI मार्फत काम करतात यांचा वापर दैनंदिन जीवनात वाढू लागलाय. येणाऱ्या काळात अजून वाढेल याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मानवाने वेळीच नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला नवीन कौशल्य वेळीच शिकण्याची गरज आहे. आज आपण AI म्हणजे काय? AI मुळे नोकरदार वर्गाला फटका बसणार आहे का? AI च्या जगात कोणते स्किल्स तुम्हाला शिकणे गरजेचे आहे? तुम्ही तुमची नोकरी कशी वाचवाल या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या अनेक बड्या कंपनी कमी वेळात, कमी खर्चात अधिक काम करणाऱ्या Ai मशीनच्या प्रेमात आहेत त्यामुळे नोकरदार वर्गाला घाबरण्याची गरज आहे पण जर तुम्ही स्वतःवर, तुमच्या कौशल्यावर आणि गुणांवर काम केल्यास तुम्हाला AI सारख्या तंत्रज्ञानाला घाबरण्याची गरज नाही.
सर्जनशीलता (Creativity)
AI ला सांगितलेलं काम अचूक करेल यात काही शंका नाही पण त्या कामात creativity आणणं हे एखाद्या मशिनला जमण तसं कठीणच आहे. AI पेक्षा काही वेगळं करायचे असल्यास आता करत असलेल्या कामात creativity शोधा.
गंभीर विचार (Critical Thinking)
क्रिटिकल सिच्युएशन मध्ये विचार करणे हे AI मशीनला जमणार नाही. ही मशीन निर्णय घेऊ शकते पण एखाद्या गंभीर विषयावर अचूक निर्णय घेण्यासाठी AI सक्षम नाही.
भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)
आपले तंत्रज्ञान इतकं ही विकसित झालेलं नाही जे लोकांच्या भावना समजून घेईल. हे देखील एक प्रकारचे कौशल्य आहे याची जागा AI घेऊ शकणार नाही. एखाद्याची भावना समजून घेणे वेळीच त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हे एखाद्या मशीनला समजणं कठीणच आहे.
नेतृत्व (Leadership)
नेतृत्व हा अनुभवाने विकसित होणारे कौशल्य आहे. नेतृत्व करण्यासाठी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता अंगी असणे गरजेचे आहे. यामध्ये मानव मशीन पेक्षा कितीतरी पट चांगला आहे.
वेळेच व्यवस्थापन (Time Management)
मशीन थकत नाही हे खरं आहे. एखादं काम जलद गतीने व कार्यक्षमतेने पार पाडण्यात मशीनने प्रावीण्य मिळवले आहे. पण कोणत्या कामाला प्राधान्य द्यावं हे आज ही मशीनला कळत नाही त्यासाठी टाईम मॅनेजमेंट चे कसब असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आजही कामं वेळेच्या व्यवस्थापनावर चालवली जातात.
नोकरदारवर्ग भविष्याच्या चिंतेत बुडालेला आहे. पण मानवानं AI सारख्या तंत्रज्ञानाला न घाबरता त्याच्यासोबत दोन हात करण्याची गरज आहे असा सांगणारा रिपोर्ट मात्र अजूनही प्रदर्शित नाही झालाय. AI च्या जगात Update आणि Upgrade असणारा मनुष्य केवळ तग धरू शकतो.