• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, August 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Tejas Thackeray: तेजस ठाकरे शिवसेनेत आले तर काय होईल? पुन्हा राजकीय प्रवेशाच्या चर्चा

Manasi Devkar by Manasi Devkar
August 8, 2023
in महाराष्ट्र, POLITICS
0
Tejas Thackeray: तेजस ठाकरे शिवसेनेत आले तर काय होईल? पुन्हा राजकीय प्रवेशाच्या चर्चा
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांचे धाकटे चिरंजीव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री होणार अशा बातम्या नेहमीच येत असतात. मात्र आजपर्यंत तरी तेजस ठाकरेंनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेला नाही. ठाकरे गटाच्या उपनेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या ट्वीटमुळे आता पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण तेजस ठाकरे खरंच राजकारणात येऊ शकतात का? तसेच त्यांच्याविषयी माहिती घेऊयात.

सोमवारी (7 ऑगस्ट) तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. सोबतच तेजस यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक संकेतही दिले. “निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार!”, असं पेडणेकरांनी ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

कोण आहेत तेजस ठाकरे? (who is Tejas Thackeray)

खरंतर याआधी देखील पेडकरांनी तेजस यांचं कौतुक करत त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. पण तेजस ठाकरेंना मात्र राजकारणापेक्षा वन्य जीवसृष्टीमध्ये अधिक रुची आहे. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. उद्धव ठाकरेंप्रमाणेच त्यांना प्राण्यांची आवड आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपली ही आवड जोपासत काही प्राण्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी साप आणि खेकड्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. खेकड्यांच्या प्रजातीपैकी एका प्रजातीला त्यांनी आपल्या ‘ठाकरे’ आडनावावरून नाव दिलं आहे.

तेजस ठाकरे म्हणजे बाळासाहेबांची छबी

शिवसेनेत बंड झालं त्यावेळी आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद देण्यात यावं आणि तेजस ठाकरेंकडे युवासेनेची धुरा सोपवावी, अशी मागणी पक्षातून होत होती. तेजस ठाकरे हे जर ठाकरेंच्या शिवसेनेत आले तर पक्षाला फायदा होऊ शकतो, असं काहींचं म्हणणं आहे. कारण तेजस हे आक्रमक स्वभावाचे आहेत. स्वतः बाळासाहेबांनी आपल्या एका भाषणात तेजस ठाकरेंची ओळख करताना आपल्या स्वभावात साम्य असल्याचं सांगितलं होतं. “आदित्य हा शांत आणि संयमी आहे, तर तेजस माझ्यासारखा गरम डोक्याचा आहे”, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

तेजस ठाकरे शिवसेनेत आले तर काय होईल?

त्यामुळे तेजस यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला तर ठाकरेंना एक नवीन आक्रमक चेहरा मिळेल. तसेच ते ‘ठाकरे’ असल्यामुळे शिवसैनिकांना आणि युवा पिढीला त्यांच्याविषयी आकर्षण असू शकतं. त्यामुळेच त्यांनी राजकारणात यावं, अशी मागणी युवासेनेकडून होत असते. शिवाय शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देवू शकतात, असं काही राजकीय विश्लेषक सांगतात.

तेजस यांचे थोरले बंधू आदित्य ठाकरे यांचा राजकारणात सक्रिय सहभाग आहे. मात्र तेजस यांनी कधीच राजकारणात प्रवेश केला नाही. पण आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यावेळी त्यांच्या प्रचारात तेजस यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव त्यांच्या भेटीला आले होते. तेव्हा त्या बैठकीला उद्धव ठाकरेंसह तेजस ठाकरेही उपस्थित होते. तेव्हा सुद्धा त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या. यानंतर शिवसेनाफुटीवेळी देखील तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली होती. तेजस ठाकरे राजकारणापासून तसे दूर असले तरी अनेकदा राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असते. त्यामुळेच त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगताना दिसतात.

Previous Post

Harishchandra gad Trek : हरिश्चंद्र गडावरील ट्रेकमध्ये तरुणाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू

Next Post

Hari Narke : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचा अजरामर जीवनप्रवास

Next Post
Hari Narke : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचा अजरामर जीवनप्रवास

Hari Narke : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचा अजरामर जीवनप्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Ayodhya Lok Sabha Election Result : घाई करून अयोध्येत राम मंदिराचा जीर्णोद्धार केला खरा, पण तरीही अजेंडा फसला का?अयोध्येतही भाजपची हार

Ayodhya Lok Sabha Election Result : घाई करून अयोध्येत राम मंदिराचा जीर्णोद्धार केला खरा, पण तरीही अजेंडा फसला का?अयोध्येतही भाजपची हार

1 year ago
sambhaji bhide

Sambhaji Bhide : महात्मा गांधींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास

2 years ago
Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

2 years ago
ONLINE SIP सुरू करायचा विचार करताय? वाचा सविस्तर माहिती

ONLINE SIP सुरू करायचा विचार करताय? वाचा सविस्तर माहिती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.