मुंबई : 20 जानेवारीला जालनाच्या अंतरवली सराटीतून निघालेलं भगवं वादळ आज मागण्या मान्य झाल्यानंतर समाधानी झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले आहे की, मलाही गोरगरीब समाजाच दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Big News : … आणि विजयाचा गुलाल उधळलाचं ! महाराष्ट्र सरकारचा अध्यादेश, नोंदी सापडल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार
दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावं. कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावे आणि तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावे अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या होत्या त्या मागण्या मान्य करण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र देऊन मनोज जरांगे यांना गुलाल लावला आहे.
नेमकं भाषणात काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” मराठा समाजासाठी ज्याने संघर्ष केला ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो. फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष मराठा आंदोलनाकडे लागलं होतं. आपण अतिशय शिस्तीत आंदोलन केले. कुठेही आंदोलनाला गालबोट न लागता यशस्वी केले. याबद्दल अभिनंदन करतो. आपल्या आंदोलनाचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब समाजाचं दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.