वसई : वसईमध्ये एका तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुरडीची गळा दाबून हत्या Murder करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या करणारा देखील अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे केवळ ही चिमुरडी या अल्पवयीन आरोपीला ‘शेंबड्या’ म्हणून चिडवत होती. म्हणून त्याने थेट तिचा गळा आवळून तिची निष्ठुरपणे हत्या केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एक डिसेंबर रोजी ही चिमुरडी घराजवळच असणाऱ्या दुकानामध्ये आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली. घरच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती सापडून आली नाही म्हणून तिच्या वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी तिच्या घरचे आणि पोलीस तिचा शोध घेत होते. घरच्यांनी मुलीची माहिती देणाऱ्याला २० हजाराचे बक्षीस देखील जाहीर केलं. पण अखेर चार डिसेंबरला सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान एका चाळीमध्ये या चिमुकलीचा मृतदेह सापडून आला. ज्या चाळीच्या खोलीमध्ये तिचा मृतदेह सापडला ही खोली बंद होती. खोलीतील बाथरूममध्ये एका प्लास्टिकच्या गोणीत तिचा मृतदेह सापडला. चार दिवस हा मृतदेह तिथे पडून असल्याने कुजलेल्या अवस्थेत असलेला या मुकलीचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार तिची हत्या गळा दाबून करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
असा लागला छडा !
दरम्यान पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र फिरवली होती. कुटुंबीयांची आणि परिसरातील लोकांची बारकाईने चौकशी केली जात होती. अशातच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा देखील गायब नसल्याचे पोलिसांना समजलं. पोलिसांनी या मुलाच्या घरच्यांकडे चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी विसंगत उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला म्हणून पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीच्या वडिलांनीच लपवला मुलाचा गुन्हा
आपल्या मुलाने चिमुरडीची हत्या केली आहे ही गोष्ट समजल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी थेट या मुलीचा मृतदेह या प्लास्टिकच्या गोणीमध्ये पाय बांधून बंद असलेल्या चाळीतील खोलीमध्ये टाकला होता.
दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली. आरोपी अल्पवयीन मुलाचा देखील पोलीस कसून तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने कुटुंबीयांवर एकच शोककळा पसरली आहे.