Pune Crime news : देशभरात सध्या वातावरण निवडणूकांचे आहे. तर राज्यात कुणबी-मराठा आरक्षण आंदोलनाला जोर आहे. अशातच एक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यात घडली असून या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. पुण्यात मुलांवरील आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. (Pune Rape News sexual abuse of two five year old children a shocking incident in pune crime news)
पुण्यातील लोणीकंद परिसरातील सांगवी सांडस येथे एकाच कुटुंबातील पाच वर्षाच्या भाऊ व बहिणी सोबत एका २८ वर्षीय तरुणाने पॉर्न दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीसांनी तरुणाला अटक केली आहे. स्वप्नील ढमढेरे (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलांच्या आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षाची मुलगी व तिचा भाऊ हे दोघे जण घरासमोरील अंगणात खेळत होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा असलेला आरोपी स्वप्नील याने मुलांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना घरी नेले. यावेळी त्यांना पॉर्न व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर त्याने अत्याचार केले. दरम्यान, याबाबतची माहिती मुलांनी घरी गेल्यानंतर पालकांना सांगितली. मुलांनी सांगितलेला प्रकार ऐकून पालक हादरले. त्यांनी त्यातडीने पोलिस ठाण्यात जाऊन याची तक्रार दिली. पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आणखी वाचा – Pooja sawant post: “We are engaged…” अखेर पूजा सावंतनं उरकला साखरपुडा, कोण आहे ‘ही’ व्यक्ती?
आणखी एक धक्कादायक प्रकार समोर
कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने ४० वर्षीय महिलेशी ओळख वाढवून महिलेच्या घरी जावून तिला ‘तु मला खुप आवडतेस, आपण दोघे लग्न करु, मी कोणास काहीएक सांगत नाही’ असे बोलून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला जबरदस्तीने पाठीमागून मिठी मारुन तिचा हात पकडून गैर वर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी पिडित महिलेने आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी भिमराव सुग्रीव देवमुंढे (वय २९,रा. कोंनढवा,पुणे) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.