नेवासा : MAHARASHTRA POLITICS सध्या जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या झंझावाती सभा सुरु आहेत. मनोज जरांगे आपल्या प्रत्येक सभेतून मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यावर थेट निशाणा साधत आहेत. दरम्यान, येवल्यात गावबंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोबतच, भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याचा इशारा यावेळी थेट राज्य सरकारला दिला आहे.
हे वाचलेत का ? Deputy CM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपूर येथे घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन
यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठ्यांना आरक्षण म्हंटले की विरोध चालू झाला. अनेकजण मराठा खेकड्यासारखा असल्याचे म्हणायचे, पण आता करोडो बांधव एकत्र आले आहे. ही लाट आता थांबणार नाही. तो म्हातारा कसंही बरळत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, त्याची लायकी देखील नाही की आपण त्याचं नाव घ्याव. सर्वांचं खातो आणि म्हणतो मी खात नाही. येवल्यात आमचे बोर्ड फाडले असे कळते, अजित दादाला सांगतो त्याला समजावून सांगा. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही सांगतो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आमचे बोर्ड फाडले असतील, तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल.
तुम्हाला हे जड जाईल आधीच सांगतो. चिल्लर चाळे करू नको म्हणून त्याला सांगत आहे. सरकारला देखील हे जड जाऊ शकते, गंभीर्याने घ्या, सरकारला त्रास होईल. येवल्यात मराठा बांधवांचे गावबंदीचे बोर्ड फाडल्यावरून जरांगे यांनी सरकारला ईशारा दिला आहे. याला दोन-तीन दिवसांत शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम आहेत. फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, मराठ्यांना आवाहन आहे, आरक्षणाची अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे सध्या शांत रहा, आम्हाला आरक्षण येऊ द्या मग पाहतो हा कुठे पळतो. आता होर्डिंग फाडल्याचे व्हडिओ काढून ठेवा. नंतर बघू हा एकाच गल्लीत आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.