मुंबई : मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आज आंदोलन केलं. मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाने आता रौद्र रूप घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी हे आंदोलन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करून ताब्यात घेतले आहे.
मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आमदार आंदोलन करत होते. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले. आम्ही आमच्या समाजासाठी भूमिका घेत आहोत. यात चुकीचं काय आहे? आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा आरक्षण द्या, असा आक्रोश यावेळी आमदारांनी केला आहे.