पुणे : पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडें यांनी ड्रीम 11 या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले होते. पण सध्या ते कारवाईच्या कचाट्यात देखील अडकले आहेत. पोलीस उपयुक्तांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे, अशातच आता भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी देखील थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पीएसआय झेंडे यांची तक्रार केली आहे.
हे वाचलतं का ? ड्रग्जमाफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक ! ड्रग्ज प्रकरणातील अनेक खुलासे होण्याची शक्यता
काय आहे प्रकरण ?
वर्दीत ते ही ऑन ड्युटी ऑनलाईन गेमिंग मधून पैसे मिळवणं आणि पुन्हा वर्दीत घालूनच माध्यमांपुढं येऊन सांगणं, यातून तरुणांना त्यांनी अशा ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी खाते निहाय चौकशीचा फास देखील आळवला आहे. वर्दीत ऑनलाईन गेम खेळणं कायद्यात बसतं का ? त्यातून रक्कम मिळाल्यावर माध्यमांना वर्दीत उभं राहून मुलाखत देता येते का ? या अंतर्गत झेंडेंची पोलीस उपायुक्त चौकशी करत आहेत.
हे वाचलतं का ? CRIME NEWS : ड्रग्जमाफिया ललित पाटील म्हणतो, “मी ससून मधून पळालो नाही मला पळवल गेलं !” पळवण्यामागे कोणाचा हात ?
पुढच्या काही तासांमध्ये याचा सविस्तर अहवाल येणं अपेक्षित आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. असा असताना पोलीस अधिकाऱ्यानेच या माध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं बोललं जातंय.