मुंबई : मी कुणाच्या टीकेला उत्तर देत नाही. मागील 3 ते 4 दिवस माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिलं नाही. माझा त्याचाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पालकमंत्री होतो. मी एवढ्या वर्षात कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. जर एखाद्याचं काम होत नसेल तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो. पण चुकीचं काही काम करत नाही.” असे थेट स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीरा बोरवणकर यांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. मागील 3 ते 4 दिवस माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिलं नाही. माझा त्याचाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पालकमंत्री होतो, असं अजित पवार म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव असून रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मीरा बोरवणकरांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून येरवडा जेल परिसरातील जमिनीसंबंधित अजित पवारांवर आरोप केले होते. त्यावर अजित पवारांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. मी आजपर्यंत म्हणजे जवळपास 32 वर्षे झाली, माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझ्याकडे आतापर्यंत अनेक विभागांचा कारभार होता, त्या अधिकाऱ्यांशी मी योग्य पद्धतीने वागलो असल्याचं अजित पवार म्हणाले.
मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात बरच काही आहे, पण माझ्यावर फोकस का केला जातोय असाही सवाल अजित पवारांनी विचारला. ते म्हणाले की या प्रकरणानंतर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी माझी चौकशी करा अशी मागणी केली. तो त्यांचा अधिकार आहे. असे देखील ते म्हणाले आहेत.