मुंबई : राज्य सरकारने एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आय IRCTC च्या वेबसाईट द्वारे आता एसटी महामंडळाच्या बसचेही तिकीट आरक्षण मिळवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 75 टक्क्यांहून अधिक प्रवासी हे आय IRCTC च्या ऑनलाईन तिकीट पोर्टलवरून त्यांच्या रेल्वे प्रवासाची तिकिटे बुक करतात. त्यामुळे आता एसटी बस बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
IRCTC आणि एसटी महामंडळ यांच्यात हा सामंजस्य करार झाल्याने प्रवाशांना आता तिकीट आरक्षित करणे, सुलभ होणार आहे. https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर नजीकच्या काळात एसटी बसचे तिकीट बूकिंग करता येईल.