मुंबई : मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आज व्यावसायिक राज कुंद्रायाची Raj Kundra तब्बल 97 कोटींची संपत्ती जप्त केली. राज कुंद्रा हा प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty हिचा नवरा आहे. या कारवाईमध्ये शिल्पा शेट्टीच्या फ्लॅट आणि बंगल्यावर देखील जप्ती आली आहे.
नेमकं प्रकरण काय
मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राज कुंद्रा याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 2021 साली पोर्नोग्राफी प्रकरणांमध्ये राज कुंद्रा याचं नाव गुंतलं होतं. यानंतर त्याच्यावर अनेक आरोप झाले. अटकेनंतर काही महिन्यांनी राज कुंद्रा याला जामीन मिळाला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा कारवाई केली असून त्या कारवाई मध्ये तब्बल 97 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जुहू येथील एक फ्लॅट, पुण्यातील एक बंगला आणि इक्विटी शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी राज कुंद्रा याच्यावर 2018 मध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी देखील राज कुंद्रा याची चौकशी झाली होती. एकंदरीतच राज कुंद्रा याच्या संकटामध्ये वाढ होताना दिसून येते आहे.