बारामती : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दरम्यान या अटकेचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या अटकेबाबत भाजपावर कडाडून टीका केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, एका प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं हे काम सुरू आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार
बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका करताना म्हटले आहे की, ” राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यापर्यंत भाजप गेला आहे. सध्या चिंतेची अवस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे बँकेचे अकाउंट सील केले आहे. त्यांचे अकाउंट गोठवल्यामुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेने जे नियोजन केलेले होते ते पूर्ण कोलमडून पडले आहे. लोकांचा प्रवास थांबवला बाकीच्या सुविधा या पद्धतीने त्यांचे खाते गोठवून थांबलेल्या आहेत. एका दृष्टीने देशातील महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्यासाठी साधनसामग्री ही उपलब्ध करून द्यायची नाही अशी भूमिका असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, ” आतापर्यंत देशात काही अपवाद वगळता निवडणुका अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये झालेल्या आहेत. मोदी सरकार आल्यानंतर या वेळची निवडणूक किती सुयोग्य वातावरणात होईल याची आम्हाला सगळ्यांना शंका आहे असे ते म्हणाले आहेत.