मुंबई : मुंबईच्या मंत्रालयामध्ये Ministry of Mumbai दिवसातून हजारो लोक कामानिमित्त येत असतात. दरम्यान आज एक तरुण मंत्रालयात त्याच्या काही वैयक्तिक कामानिमित्त आला होता. यावेळी या तरुणांन अचानक मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मंत्रालयामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. मंत्रालयात प्रवेश करतेवेळी कसून तपासणी केली जाते. या व्यक्तीने त्याच्या वैयक्तिक कारणासाठी मंत्रालयात प्रवेश केला आणि काही वेळाने त्यांना अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली खरी पण मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीमध्ये हा तरुण अडकला आणि त्यामुळे त्याचे प्राणही वाचले आणि मोठी दुर्दैवी घटना देखील टळली आहे.
या तरुणाचं नाव अरविंद बंगेरा असून तो बोरिवलीमध्ये राहतो. तसेच तो वडापावची गाडी चालवतो अशी प्राथमिक माहिती समजली आहे. त्यांनी नेमकं असं टोकाचे पाऊल का उचललं ? हे मात्र अद्याप समजू शकल नाही. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला ताब्यात घेतलय. अधिक चौकशी सुरू आहे.