मुंबई : लोकसभा निवडणुकीची तयारी खरंतर सर्वच पक्ष कित्येक महिन्यांपासून करत आहेत. पण महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो जागा वाटपावरून बराच काळ गोंधळाची परिस्थिती दिसून येत होती. आता एकीकडे निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा काही वेळातच होण्याची दाट शक्यता आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बरेच दिवस गोंधळ सुरू होता. दरम्यान आता हा जागा वाटपाचा पेच सुटला असल्याचं समजत आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटान आघाडी घेतल्याचे देखील समजत आहे. अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्वात जास्त 22 जागा मिळाल्या असल्याचं राजकीय सूत्रांनी म्हटल आहे.
काही वेळातच उद्धव ठाकरे आपल्या 22 अधिकृत उमेदवारांची नावांची घोषणा करू शकतात. तर यामध्ये अद्याप देखील चार जागांवर उमेदवारांबाबत गोंधळ सुरूच आहे. पाहूयात ही संभाव्य उमेदवारांची यादी..
बुलढाणा -नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
परभणी – संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – विजय करंजकर
ठाणे – राजन विचारे
मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर
रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
रायगड – आनंद गीते
सांगली – चंद्रहार पाटील
हातकणंगले – राजू शेट्टी (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )
मावळ – संजोग वाघेरे
या 4 लोकसभा मतदार संघामध्ये अद्यापही गोंधळ
उत्तर मुंबई-
कल्याण –
पालघर –
जळगाव –