छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरमध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क तर असतेच पण आता प्रश्न असा पडतोय की पोलीस आयुक्तालयातील सुरक्षा ऐरणीवर आली आहे का ? कारण गेल्या आठवड्यातच एका तरुणानं गुन्हा दाखल करून घेत नाहीत म्हणून थेट आयुक्तांचीच गाडी ची काच फोडली होती आता पुन्हा एकदा आज आयुक्तालयामध्येच दोघांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं
नागराज गायकवाड हे छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते यावेळी आणखीन एक व्यक्ती आयुक्त कार्यालयात त्याच्या वैयक्तिक कामासाठी आली होती. या दोघांमध्ये काही कारणाने वाद सुरू झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी आणि शिवीगाळ देखील झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विद्यापीठातील एका जुन्या वादावरून हा वाद झाला असल्यास प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे.
दरम्यान भर आयुक्त कार्यालयातच या दोघांमध्ये तुफान वाद सुरू झाला फ्रीस्टाइल हाणामारी आणि शिवीगाळ झाल्यामुळे पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली.