Winter Session : शरद पवार कि अजित पवार ? चर्चांना पूर्णविराम ! आमदार नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार याचे असे दिले स्पष्ट संकेत, वाचा सविस्तर

यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला Winter Session नागपूरमध्ये Nagpur आजपासून सुरवात होते आहे. महाराष्ट्रातील सध्याच राजकीय वातावरण पाहता हे अधिवेशन वादळी होणार यात शंका नाही. दरम्यान आज पहिल्याच दिवशी गटातटाचे राजकारण पाहायला मिळाले. अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक Nvab Malik कोणत्या गटात सामील होतात यावर तर्क वितर्क लढवले जात होते.