पत्राचाळ घोटाळा प्रकरण : स्वप्ना पाटकरांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे बनल्या ढाल, यावेळी निशाणा थेट उद्धव ठाकरेंवर, कोण आहे स्वप्ना पाटकर ?

पत्राचाळ घोटाळा प्रकरण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जबाब दिल्याने स्वप्ना पाटकर यांनी 2013 पासून अनेक वेळा संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. संजय राऊत यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे असं स्वप्न पाटकर यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी आज शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.