PUNE CRIME : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये राडा; अल्पवयीन मुलांच्या टोळक्यामध्ये शाळेबाहेरच जुंपली; बघ्यांनी काढले फक्त VIDEO !

पुण्यातील उरळीकांचन परिसरामध्ये बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक यासाठी की 20 ते 25 मुलांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. यामध्ये ही मुलं अल्पवयीन आहेत हे एक विशेष आणि त्यासह या मुलांना मारहाण करताना पाहणारे नागरिक केवळ या मुलांचे व्हिडिओ काढण्यात दंग होते.