'मोदी' आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना मोठा दिलासा

काँग्रेससाठी मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे.

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात मार्च 2023 मध्ये सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

2019 मध्ये राहुल गांधींनी 'मोदी' आडनावावरून टिप्पणी करत "सर्व चोर 'मोदी'च का असतात" असं वक्तव्य केलं होतं.

गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी यावर आक्षेप घेत गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

यानंतर राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली 

हा राहुल गांधींसह कॉंग्रेससाठी मोठा दिलासा मानला जातोय.