Prakash Shendge : मागासवर्ग आयोगाने केलेलं सर्वेक्षण अयोग्य, खोटी माहिती नोंदवली ! ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये जात, सीटवर आणि जंगम मालमत्ता, उत्पन्न, शिक्षण, घरातील विविध संसार उपयोगी आणि उपभोग्य वस्तू, कुटुंबीय यांची संख्या, त्याचबरोबर घरातील चाली, प्रथा, परंपरा यांची देखील माहिती घेण्यात आली. परंतु हे सर्वेक्षण घाईघाईने पूर्ण करण्यात आले असून अयोग्य आणि खोटी माहिती नोंदवल्याचा गंभीर आरोप राज्य मागास वर्ग आयोगावर ओबीसी नेते प्रकाश शिंदे यांनी केला आहे.