Maratha Reservation : ” गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ?” संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका

सध्या मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील या विषयावर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण देखील तापलं आहे. सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच आता विरोधक देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका करत आहेत.