विधानपरिषद निवडणुक : लोकसभेनंतर लगेचच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर

सध्या देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात आणि देशात आतापर्यंत तीन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. अजून दोन टप्प्यात निवडणुका पार पडायच्या शिल्लक आहेत. दरम्यान लोकसभेच्या या निवडणुकांची प्रक्रिया संपते न संपते तो विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्या आहेत.