Doctors strike : महत्वाची बातमी ! 7 फेब्रुवारी पासून राज्यातील निवासी डॉक्टरांची संपाची हाक; आरोग्य सेवा कोलमडणार ?

एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. उद्या बुधवार दि. 7 फेब्रुवारीला राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने केवळ आश्वासनाची माळ या निवासी डॉक्टरांच्या गळ्यात घातली आहे.