CRIME NEWS : 8 वर्षाची चिमुरडी ‘शेंबड्या’ म्हणून चेष्टा करायची; रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने केली निष्ठुरतेने हत्या, वसईमध्ये खळबळ

वसईमध्ये एका तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुरडीची गळा दाबून हत्या Murder करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या करणारा देखील अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे केवळ ही चिमुरडी या अल्पवयीन आरोपीला ‘शेंबड्या’ म्हणून चिडवत होती. म्हणून त्याने थेट तिचा गळा आवळून तिची निष्ठुरपणे हत्या केली आहे.