Budget Session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ९ फेब्रुवारीला संपणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज संसदेत सर्वपक्षीय बैठक पार पडली.