Budget 2024 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात, वाचा ठळक मुद्दे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने हा पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा पहिलाच अंतरिम अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.