BREAKING : पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आगीची घटना; फटाक्याच्या गोदामाला आग लागून 6 महिलांचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. पिंपरी चिंचवडच्या तळवडे एमआयडीसीत एक फटाक्याचं गोदाम आहे. या गोदामाला भीषण आग Massive Fire लागल्याची घटना घडली आहे. दुर्दैवी म्हणजे ही आग एवढी झपाट्याने पसरली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या आगीची भीषणता होती की यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.