BIG NEWS : ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल !व्यासजींच्या तळघरात व्यास कुटुंबीयांना पूजा करण्याची परवानगी

ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल आज घोषित केला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी व्यास कुटुंबीयांना ज्ञानवापी येथील व्यासजी तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. १९९३ पासून ३१ वर्षे तळघरातील पूजा बंद होती. वाराणसीचे डीएम 7 दिवसांच्या आत पुजारी नियुक्त करतील, त्यानंतर व्यास कुटुंबीय पूजा सुरू करू शकतील, असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.