Oppenheimer : ओपेनहायमर, भगवद्‌गीता आणि अणुबॉम्ब यांचा काय संबंध?

Oppenheimer : १५ जुलै १९४५च्या रात्री ओपेनहायमर केवळ ४ तास झोपले होते. कारण दुसऱ्या दिवशी त्यांच्या ६ वर्षाच्या मेहनतीचा फलित दिसणार होता. चाचणीच्या दिवशीची पहाट झाली.त्यांचं वजनही गेल्या ६ वर्षात कमी होऊन ५२ किलोवर आलेलं होत. ते चिंतेत व्याकुळ होऊन मेक्सिकोच्या एका बंकरमध्ये येरझाऱ्या मारू लागले, तितक्यात काऊंटडाऊन सुरु होऊन बंकर हुन १० किलोमीटर अंतरावर स्फोट झाला.